धाराशिव बसस्थानकावर महिलेची पर्स चोरीस

64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास 
 
crime

धाराशिव : हानुमान चौक, बार्शी रोड उस्मानाबाद येथील- माधवी रंगनाथ घोंगडे या दि.26.05.2023 रोजी 12.30 वा. दरम्यान उस्मानाबाद बसस्थानक येथे माजलगाव ते सोलापूर बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने माधवी यांचे पर्सची चैन खोलून पर्स मधील अंदाजे 1,67,200 ₹ किंमतीचे 64 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे चोरुन नेले. अशा मजकुराच्या माधवी घोंगडे यांनी दि. 26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : सराटी, ता. तुळजापूर येथील- अभिमान रामचंद्र बरगडे यांचे अंदाजे 56,000 ₹ किंमतीचे 14 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व  चांदीचे दागिणे हे दि.25.05.2023 रोजी 21.00 ते दि.26.05.2023 रोजी 03.30 वा. सु. बरगडे यांचे कुडाचे घरातील खुंटीला अडकवून ठेवलेल्या कॅरीबॅगमधील अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अभिमान बरगडे यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नुकसान करणे

शिराढोण  : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील- रामचंद्र भिमराव भक्ते यांचे शेत गट नं 72 पाडोळी ता. कळंब येथील शेतातील उसाचे पिकाला, ऊसामधील ठिबक सिंचनचे पाईप व दोन आंब्याची झाडाला पाडोळी, ता. कळंब येथील- जब्बार  सरदार शेख यांनी दि.26.05.2023 रोजी .08.30 वा. सु. आग लावून दिली. या मध्ये भक्ते यांचे ऊस जाळून नुकसान केले. अशा मजकुराच्या रामचंद्र भक्ते यांनी दि. 26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : मलकापूर, ता. परंडा येथील- ग्रामपंचायतचे कार्यालयाचे पाठीमागील खिडकीतुन अज्ञात व्यक्तीने आग लावून ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्च्या, कॉम्प्युटर रुम मधील प्लायवुड जाळून अंदाजे 40,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या  ग्रामसेवक- बाळासाहेब देवीदास तुपेरे रा. चिखर्डे, ता. बार्शी यांनी दि. 26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435,427, सह सा.सं.नु.प्र. का. कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.