उमरग्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

 कार घेण्यासाठी  माहेराहून दोन लाख रुपये घेवून म्हणून सासरच्या मंडळींकडून  छळ 
 

उमरगा  :  कार घेण्यासाठी  माहेराहून दोन लाख रुपये घेवून  म्हणून सासरच्या मंडळींकडून  छळ व जाच झाल्यामुळे उमरग्यात एका  विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी   गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मयत नामे-सुमन अमोल काळे, वय 24 वर्षे, रा. नाईचाकुर, ता. उमरगा हा.मु.बालाजी नगर, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि. 25.08.2023 रोजी 02.00 वा. सु. बालाजी नगर, उमरगा येथे गळफास घेवून आत्महत्या केली. 

आरोपी नामे- 1)अमोल अशोक काळे पति, 2) अक्षय अशोक काळे दिर, 3) अशोक काळे सासरा, 4) सुनिता अशोक काळे सासु, 5) गोकर्णा बनसोडे ननंद, 6) कस्तुराबाई आजीसासु यांनी मयतेस माहेरहुन कार घेण्यासाठी 2 लाख रुपये घेवून ये व धोंड्याचे महिन्यामध्ये एक तोळ्याची सोन्याची अंगठी घालण्यास सांग असी मागणी करुन मयत सुमन काळे यांना मारहाण करुन त्रास दिल्यामुळे त्यांना वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे, अशा मजकुराच्या मयताचे वडील व्यंकट माणिक दुधभाते, वय 50 वर्षे, रा. लामजणा ता. औसा जि. लातुर यांनी दि. 25.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 304(ब), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 लोहारा  : आरोपी नामे-1) कृष्णा बब्रुवान गोंधळी, वय 28, रा. जेवळी द., ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी दि. 25.08.2023 रोजी 13.05 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 676 हा बाजार चौकातील रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे- 2) विठ्ठल किसन कांबळे, वय 37 वर्षे रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0883 हा लोहारा येथील आंबेडकर चौक ते खेड जाणारे सार्वजनिक रस्त्यावर आंबेडकर चौक येथे रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. तर 3) तमीज शहाबुद्दीन शेख, वय 45 वर्षे रा. इदगाह मोहल्ला, लोहारा, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 15.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 13 बी 1244 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कानेगाव जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.