धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगे  फॉरेस्ट मध्ये तरुणीवर मारहाण करून गॅंगरेप 

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
 

धाराशिव  : धाराशिव तालुक्यातील  अंबेजवळगे  फॉरेस्ट मध्ये  एका २८ वर्षीय तरुणीवर तिघांनी मारहाण करीत आळीपाळीने बलात्कार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 


धाराशिव तालुक्यातील एका गावातील एका  28 वर्षीय तरुणीवर  अंबेजवळगे शिवार तळ्याजवळ उमेश पाटील यांचे शेतात व तळ्याजवळील  फॉरेस्ट मध्ये आरोपी नामे1) दिपक लिंबा राठोड, 2) राम उर्फ रम्या हरिशश्चंद्र राठोड 3) मनेश उर्फ पिल्या शेषेराव चव्हाण  सर्व रा. अंबेजवळगे ता.जि. उस्मानाबाद यांनी  नमुद मुलीस मारहाण करुन धमकी देवून ज्वारीच्या पिकात नेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मागील चार महिन्यापासून  वारंवार लैंगीक अत्याचार करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . 

 पिडीतीचा भाउ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम-376(ड), 323, 506 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 
 
मुरुम  : आरोपी नामे-1)राजेंद्र श्रीमंत शिंदे,2) श्रीमंत शिंदे,3) कमला श्रीमंत शिंदे,4)शोभा राजेंद्र शिंदे, सर्व रा. आष्टाकासार, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद यांनी बांधावर तननाशक औषध का फवारले या कारणावरुन दि.08.08.2023 रोजी 11.00 वा. सु. आष्टाकासार शेत शिवारात फिर्यादी नामे-गुलशन वकिल शेख, वय 30 वर्षे, रा. आष्टाकासार, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, खुरप्याने डोक्यात मारुन जखमी केले. गुलशन शेख यांची सासु त्याचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन मारहाण केली. अशा मजकुराच्या गुलशन शेख यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323,  504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरोपी नामे-1)बालाजी भागवत काळे, 2) उमेश भागवत काळे दोघे रा. पवारवाडी ह.मु. कोल्हापूर 3) दिपक लाड, 4) शिवाजी जाधवर रा. रत्नापूर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद यांनी  दि.08.08.2023 रोजी 07.45 ते 09.00 वा. सु. वरुडा ते पवारवाडी दरम्यान  फिर्यादी नामे-विश्वनाथ बब्रुवान काळे वय 50 वर्षे, रा. पवारवाडी, ता. जि. उस्मानाबाद यांना वरुडा गावाजवळील पुलावर अडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, काठीने डोक्यात मारुन जखमी केले. तुझ्या मुलास बोलावून घे नाही तष्ज्ञंना खल्लास करुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या विश्वनाथ काळे यांनी दि.08.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 341, 323,  504,  506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.