तामलवाडी येथे गुटख्यासह वाहन जप्त 

 

तामलवाडी  : वार्ड नं 2 तिडक पोस्ट बामणी सडक अर्जुनी गोंदिया येथील- खुमेंद्र हरीश्चंद्र, वय 28 वर्षे, हे दि. 12.09.2023 रोजी 10.30 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथे तंबाखुचे 104 पाउच, विमल पान मसाला 104 पाउच सह वाहन क्र एमएच 14 एके 9872 असा एकुण 10,15,600 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखुचे, विमल पान मसाला गोवा गुटख्या सह वाहन विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले आढळले. 

तसेच लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन नसरीन तनवीर मुजावर, वय 44 वर्षे, व्यवसाय- अन्न व औषध प्रशासन विभाग उस्मानाबाद यांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द दि. 12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द. वि. सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 26(2)(i), 26 (2)(iv) व 27(2) (3) सह वाचन क 30(2) व दंडनिय क. 59 अंतर्गत उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

नळदुर्ग  :आरोपी नामे-1)बाबुराव किसन कुठार, 2)विश्वनाथ ईराप्पा कुठार, 3) अनंद बाबुराव कुठार, राजेंद्र मधुर कुठार सर्व रा. किलज, ता. तुळजापूर यांनी दि.12.09.2023 रोजी 11.00 वा. सु. शेत गट नं 127 मध्ये  फिर्यादी नामे-गणेश सिध्दलिंग कुठार, वय 52 वर्षे, रा.किलज, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना शेतात जनावरे सोडून नुकसान केले असे विचारले वरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहण केली. फिर्यादीचा मुलगा आकाश कुठार याचे उजव्या हातावर लाथाबुक्यांनी मारुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी गणेश कुठार यांनी दि.12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-325, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.