वाशी : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

वाशी  : तांदुळवाडी ता. वाशी येथील- अशोक नारायण चौधरी वय 66 वर्षे यांनी  सन 2018 ते दि. 08.02. 2023 रोजी  16.00 वा. सु. तांदुळवाडी येथे आत्महत्या केली. महालदारपुरी, ता.वाशी येथील- बंडु ऊर्फ दादासाहेब किसन गवारे यांच्याकडे घेतलेल्या पैशाचा तगादा लावल्याने अशोक यांनी त्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अजय चौधरी यांनी दि. 11.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोकशेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा नोंद

नळदुर्ग  :  स्वारगेट पुणे बस आगारातील बस क्र एमएच 14 बी. टी. 4775 ही नळदुर्ग बसस्थानक येथे दि.10.02.2023 रोजी 15.00 वा. सु. आली असता तिकीटाचे उरलेले पैसे देण्याचे कारणावरून वाहक-परमेश्वर नाथराव केंद्रे रा. कोंडवा बु.येवलेवाडी पुणे यांना व चालक यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून लाथाबुक्यांनी मारहान करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन वाहक- केंद्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि.11.02.2023 रोजी भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

 उस्मानाबाद  : लाईटचे कनेक्श्न तोडल्याच्या कारणावरुन दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर येथील- बाबु सिताराम राठोड यांना दि. 12.01.2023 रोजी 10.30 वा. सु. बावी आश्रम शाळेच्या पाठीमागे गावकरी- महादेव राठोड, गोविंद पवार, प्रभाकर पवार यांनी संगणमताने ठार मारण्याच्या उद्देशाने बाबु यांना मारहान केली. तर लाईटच्या पोलवर चढल्याने बाबु यांचा मृत्यु होईल हे माहित असताना सुध्‌दा लाईटचे पोलवर चढवून लाईट जोडून दे असे म्हणाले. त्यावर बाबु हे पोलवर चढून लाईट जोडून देत असताना अचानक लाईट आल्याने बाबु यांना शॉक लागून ते खाली पडून गंभीर जखमी होवून बेशुध्‌द झाले. यात महादेव, गोविंद व प्रभाकर हे बाबु यांना बेशुध्‌द अवस्थेत टाकून पसार झाले. अशा मजकुराच्या बाबु राठोड यांनी दि.11.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.