उमरगा : कौटुंबिक वादावरुन महिलेचा छोट्या मुलासह आत्महत्येचा प्रयत्न 

 

उमरगा - स्वामी निवास, उमरगा येथील- शितल हिराजी गायकवाड यांनी कौटुंबिक वादाचे कारणावरुन दि.19.11.2022 रोजी 19.00 ते 22.00 दि.22.11.2022 रोजी 12.00 ते 18.00 वा. दरम्यान कसबे उमरगा येथे जिवे मारण्याच्या उद्देशाने मुलगा- जय, वय 04 वर्षे यास तिन वेळेस ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्वता: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या वकिल- माधव विठ्ठल जाधव, रा. दाबका, ता. उमरगा यांनी दि.23.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 506, 309 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

ढोकी  : ढोकी पो.ठा. चे पथक दि. 20.03.2023 रोजी 20.30 वा. सु. ढोकी पो.ठा. हद्दीत दाऊतपूर येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना दाऊतपूर, ता. उस्मानाबाद येथील- सार्थक केसकर, गणेश काळे हे लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे गोल मुठ असलेली तलवार बेकायदेशीररीत्या हातात घेउन वाडदिवस मोठमोठ्याने गाणी वाजवून साजरा केला व गावात दहशत निर्माण करत फिरत असताना पथकास आढळले. यावर पथकाने सार्थक व गणेश यांना ताब्यात घेउन त्यांच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 सह भा. द. सं. कलम 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.