धाराशिव जिल्ह्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल 

 

ढोकी : फिर्यादी नामे- रामदास एकनाथ चौरे, वय 62 वर्षे, रा. इर्ला, ता. जि. उस्मानाबाद यांचे राहते घराच्या जिन्यातुन अज्ञात व्यक्तीने दि.11.07.2023 रोजी 12.00 ते दि.15.07.2023 रोजी 17.00 वा. सु आत प्रवेश करुन कपाटातील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख  रक्कम 25,000₹ असा एकुण 50,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रामदास चौरे यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 380,457 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : गिरवली शिवारातील रेनीव्ह पॉवर प्लॅन्ट मधील 1) हब सिरीयल नं एच 8002022 चे तीन मोटर किंमत अंदाजे 20,000₹, 2) हब सिरीयल नं एच 8002018 मधील तीन मोटर किंमत अंदाजे 20,000₹,3) हब सिरीयल नं एच 8002017 मधील तीन मोटर किंमत अंदाजे 20,000₹, 4) हब सिरीयल नं एच 8002046 मधील तीन मोटर किंमत अंदाजे 20,000₹,5) हब सिरीयल नं एच 8002038 मधील तीन मोटर किंमत अंदाजे 20,000₹, हब सिरीयल नं एच 8002036 मधील तीन मोटर किंमत अंदाजे 10,000₹ असा एकुण 1,10,000₹ रुपये किंमतीच्या 18 मोटर दि. 19.06.2023 रोजी 20.00 ते 20.06.2023 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या आहे. अशा मजकुराच्या शाम पांडूर्रग भैरट, वय 29 वर्षे, धंदा-बालाजी सेक्युरीटी मध्ये सुपरवायझर रा. शेलगाव, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 16.07.2023 रोजी 00.45 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तुळजापूर येथे पेट्रोलिंग करत असताना आरोपी नामे- महादेव बंडू क्षिरसागर, वय 20 वर्षे, रा. मातंगनगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे एक चार इंच लांबीची मुठ असलेला कोयता हा बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना पथकास आढळला. यावर पथकाने महादेव यास ताब्यात घेउन त्यांच्या जवळील ती कोयता जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये तुळजापूर पो.ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे