भूममध्ये चंदनाची झाडे चोरणारे दोघे मालासह अटकेत

 

भूम  - हिवर्डा, ता. भुम येथील अंकुश ज्ञानदेव मुंडे व दत्ता भिमराव मुंडे हे दोघे चंदनाची सुगंधीत लाकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगुन असल्याच्या गोपनीय खबरेवरुन भुम पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली. यावर पथकाने दि. 05 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. हिवर्डा येथील नमूद दोघांच्या पत्रा शेड येथे छापा टाकला असता त्यांच्या ताब्यात सुगंधी चंदनाचे 700 ग्रॅम लागडी तुकडे व एक भ्रमणध्वनी मिळुन आला. यावरुन पोलीसांनी नमूद दोघांसह चंदनाची लाकडे ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द भुम पो.ठा. येथे गु.र.क्र. 175 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 सह भारतीय वन अधिनियम कलम- 41, 42 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे तीन गुन्हे दाखल 

कळंब : निरंजनदत्त रावसाहेब पाटील, रा. मोहा, ता. कळंब यांनी मोहा शिवारातील त्यांच्या शेताता मळणी करुन ठेवलेले 6 पोती सोयाबीन दि. 04-05 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या निरंजनदत्त पाटील यांनी दि. 06 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : ऋषीकेश डोके, रा. अंतरवली व कोंडीबा खोत, रा. ताकमोडवाडी या दोघांच्या घरासमोरील अनुक्रमे हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 1177 व एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 0238 या दि. 02 ऑक्टोबर रोजी मध्य रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद  : कृष्णा गणेश, रा. उस्मानाबाद यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 7444 ही दि. 02 ऑक्टोबर रोजी 17.00 ते 18.30 दरम्यान उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रिडा मैदानातील वाहन स्थळावर लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.