उस्मानाबादेतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
उस्मानाबाद : सांजा रस्त्यावरील शिवाजीनगरात एकमेकांशेजारी राहनाऱ्या साक्षी पांडुरंग लोंढे व सुलेखा रामबरण केवट या दोन्ही 17 वर्षीय मुली दि. 24- 25 मे 2021 दरम्यानच्या रात्री पालकांना काही एक माहिती न देता बेपत्ता झाल्या आहेत. संबंधीत मुलींच्या पालकांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा क्र. 149 / 2021 नोंदवला आहे. “त्या दोन्ही मुलींच्या बेपत्ता होण्याविषयी, त्यांच्या सध्याच्या वास्तव्या विषयी काही उपयुक्त माहिती असल्यास आनंदनगर पोलीस ठाण्याशी किंवा त्या दोघींच्या कुटूंबीयांशी संपर्क साधावा.” असे आवाहन आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- दिनकर गोरे यांनी केले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
लोहारा : चिंचोली (काटे), ता. लोहारा येथील आबाजी मुरलीधर बिराजदार यांनी दि. 19.08.2021 रोजी 18.30 वा. सु. घरात आत्महत्या केली होती. आबाजी बिराजदार व तावशीगड, ता. लोहारा येथील उमेश बाबुराव बिराजदार यांच्यात शेत रस्ता रहदारी संबंधी वाद होता. मागील काही दिवसापुर्वी उमेश बिराजदार यांनी त्यांच्या शेतालगत असलेला रस्ता दार- कुलूप लावून बंद करुन आबाजी यांस शेतात येण्या- जाण्याला अडथळा केला. तसेच उमेश यांसह गावकरी- कमलबाई पवार, दादासाहेब पवार, पांडुरंग गिरी, अनंत गिरी, इंदुबाई गिरी अशा सहा जणांनी आबाजी यांच्या घरी जाउन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यांच्या या त्रासास कंटाळून आबाजी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सविता बिराजदार यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 341, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.