उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, तीन जखमी 

 

येरमाळा  : अज्ञात चालकाने दि. 04.01.2022 रोजी रात्री 08.45 वा. सु. पानगाव शिवारात येरमाळा – कळंब रस्त्यावर तेरणा नदीच्या पुलाजवळ ट्रक क्र. एम.एच. 44- 7298 हा पाठीमागील बाजूस सुचना- दिशा दर्शक फलक न लावता, पार्किंग दिवा न लावता रस्त्या मधोमध उभा केला होता. त्यामुळे अंधारात तो ट्रक मो.सा. चालक- समाधान नाना शिंदे, रा. बावी यांना दिसू न शकल्याने त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 6744 ही त्या ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात समाधान हे मयत होउन त्यांच्या पाठीमागे बसलेले सचिन चंद्रकांत शिंदे हे जखमी झाले. अशा मजुराच्या प्रशांत दिलीप शिंदे, रा. बावी यांनी दि. 05 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304(अ), 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : केज येथील तानाजी दगडू लोकरे, वय 45 वर्षे व बंकट कारभारी भोसले, सदाशिव दत्तात्रय कापरे हे तीघे दि. 17.12.2021 रोजी 19.30 वा. सु. कळंब बसस्थानकासमोरी रस्त्यावर गावी जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 23 बीबी 8153 ही निष्काळजीपने चालवल्याने नमूद तीघांना पाठीमागून धडकली. या अपघातात तानाजी लोकरे हे मयत झाले तर बंकट व सदाशिव हे दोघे जखमी झाले. अशा मजकुराच्या राजाभाऊ भिमा लोकरे, रा. विडा, ता. केज यांनी दि. 05 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.