उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार
उस्मानाबाद : तोरंबा, ता. उस्मानाबाद येथील राहुल रामभाउ पाटील (गायकवाड), वय 45 वर्षे हे दि. 21.01.2022 रोजी 20.30 वा. सु. सांजा गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 5994 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 8572 ही निष्काळजीपने चालवल्याने राहुल पाटील यांच्या मो.सा. ला समोरुन धडकल्याने या अपघातात राहुल हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा चुलत भाऊ- राजेंद्र दत्तु गायकवाड यांनी दि. 22 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : काटेवाडी, ता. उमरगा येथील ग्रामस्थ- मदार ईस्माईल शेख, वय 30 वर्षे हे दि. 16.01.2022 रोजी 20.30 वा. सु. जेवळी (उत्तर) गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 2316 ही चालवत जात होते. यावेळी वाहन क्र. एम.एच. 25 आर 3429 ने मदार शेख यांच्या मो.सा. ला समोरुन दिलेल्या धडकेत मदार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या आतिफ हशीम पटेल, रा. गुबाळ, ता. औसा, जि. लातूर यांनी दि. 22 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.