ढोकी, भूम येथे मोटारसायकल अपघातात दोन जखमी 

 

ढोकी  :फिर्यादी नामे- कुलदिप जयसिंग देशमुख, वय 27 वर्षे, व सोबत चुलती नामे- निलावती बाळासाहेब देशमुख, वय 57 वर्षे, रा.जागजी ता. जि. उस्मानाबाद हे  दोघे दि.17.08.2023 रोजी 18.00ते 18.15 वा. सु. तेर येथील सरकारी दवाखन्याचे समोरुन मोटार सायकलने गावाकडे जात होते. दरम्यान अज्ञात मोटरसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून कुलदिप देशमुख यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. यात फिर्यादीची चुलती निलावती देशमुख या  गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी कुलदिप देशमुख यांनी दि.29.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब)  184 ,177, 187 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

भूम  :फिर्यादी नामे- लक्ष्मण निवृत्ती राशीनकर, वय 65 वर्षे, रा.चिंचोली, ता. भुम जि. उस्मानाबाद हे दि.23.08.2023 रोजी 19.15 वा. सु. मामा असे नाव लिहीलेल्या पाटीजवळ चिंचोली ता. भुम येथे पायी जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 13 बी.ए 8293 चा चालक नामे सुजित रामा मोरे रा. रामेश्वर ता. भुम जि. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून पायी जात असलेले लक्ष्मण राशीनकर यांना पाठीमागून धडक दिली. यात लक्ष्मण राशीनकर गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मण राशीनकर यांनी दि.29.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.         

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 धाराशिव  : आरोपी नामे-1) हेमंत शिवाजी पवार, वय 45 वर्षे रा. येडशी ता. जि. उस्मानाबाद, यांनी दि. 28.08.2023 रोजी 16.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम रिक्षा  क्र एमएच 25 एल 0958 हा येडशी येथे रामलिंग यात्रा वाहन तळाजवळ सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.