धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 

धाराशिव  : वाशी, ता. वाशी येथील- रुक्मीणी बालासाहेब तलवारे यांच्या चिलवडी शिवारातील शेमातील शेत गट नं 50/51 मधील अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीचे 30 क्विंटल सोयाबीन,पंप,44 लोखंडी पाईप, 6 पाईप फायबर, पऱ्याचे शेडसह असा एकुण 3,00,000 ₹किंमतीचा माल हा हनुमंत देशमुख, अर्चना देशमुख, शामल देशमुख,रामकृष्ण देशमुख, निर्मला देशमुख, तानाजी माळी, सर्व रा. चिलवाडी यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या रुक्मीणी तलवारे यांनी दि.23.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : सावरगाव (पा), ता. भुम येथील- गोरख नाना शिंदे यांची अंदाजे 17,500 ₹ किंमतीचे विद्युत पंप व 500 फुट केबल हे दि.20.03.2023 रोजी 08.00 वा. पुर्वी शिंदे यांच्या शेत गट नं 23 मधील सावरगाव शिवारातील साहित्य हे राजेंद्र महानवर रा. सावरगाव (पा), ता. भुम यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या गोरख शिंदे यांनी दि.23.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.