उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीच्या दोन घटना 

 

कळंब : निल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील एका बँकेने कळंब येथील औद्योगीक विकास महामंडळ परिसरातील ‘माऊली कृपा वेअर हाउस’ हे गुदाम भाडोत्री घेतले होते. या गुदामावर बँकेचे काही लोक कर्तव्यावर असून त्यातील अज्ञाताने दि. 03- 04.01.2021 दरम्यान त्या गुदामातील 49 क्विंटल सोयाबीनचा अपहार करुन बँकेची फसवणूक केली. अशा मजकुराच्या  बँक कर्मचारी- संतोष गोराडे यांनी दि. 07 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 409, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : कसई, ता. तुळजापूर येथील धनंजय यशवंत भोवाळ व लक्ष्मी धनंजय भोवाळ या दोघासह  तुळजापूर येथील आकाश विष्णु शिंदे व निशा आकाश शिंदे अशा चौघांनी उस्मानाबाद येथील प्रशांत व प्रकाश बिभीषण साळुंके या दोघा भावांच्या विटभटीवर काम करण्यासाठी जून- 2021 मध्ये उस्मानाबाद येथे लेखी करार केला होता. यावेळी धनंजय व लक्ष्मी भोवाळ यांनी आपले खरे नाव राजेंद्र यशवंत जाधव व लक्ष्मी राजेंद्र जाधव, रा. कुंभारी असे असल्याचे भासवून त्या नावाचे बनावट आधार कार्ड करारात जोडले. तसेच त्या चौघांनी प्रशांत व बिभीषण या दोघा भावांकडून करारापोटी दोन लाख रक्कम आगाऊ घेउन आज पावेतो कामास आले नाहीत व घेतलेली रक्कमही परत केली नाही.

            अशा मजकुराच्या प्रशांत साळुंके यांनी दि. 07.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 467, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी 

उमरगा  : जकापुर कॉलनी, उमरगा येथील शिवाजी बाबुराव सगर यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 0804 ही दि. 01.01.2022 रोजी 22.00 ते 23.00 वा. दरम्यान पतंगे रोड, उमरगा येथील नातेवाईकांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी सगर यांनी दि. 07 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.