उस्मानाबाद जिल्हयात फसवणुकीच्या दोन घटना 

कळंबमध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगून शेतकऱ्यास लुबाडले 
 

कळंब  : शहाजी बाबु खंडाळे, रा. लाखा, ता. केज हे दि. 18 ऑक्टोबर रोजी 19.30 वा. सु. कळंब येथील रस्त्याने जात होते. दरम्यान एका पुरुषाने तेथे जाउन, “ मी पोलीस अधिकारी असून तू तोंडास मास्क का लावला नाही ? तुझ्या जवळ गांजा आहे काय ते मला तपासायचे आहे.” असे शहाजी खंडाळे यांना बतावनी करुन त्यांची तपासणी केली. यावेळी खंडाळे यांच्या बटव्यात असलेल्या सोयाबीनच्या 35,000 ₹ रकमे पैकी 25,000 ₹ रक्कम खंडाळे यांची नजरचुकावून काढून घेतली. अशा मजकुराच्या शहाजी खंडाळे यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 170 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
  दुसऱ्या घटनेत श्रीमती हिरकणा नारायण जाधव, वय 70 वर्षे, रा. भुम या दि. 20 ऑक्टोबर रोजी  12.00 वा. सु. शहरातील रथगल्ली येथील दत्त मंदीरात गेल्या असता दोन अनोळखी पुरुषांनी, “तुमच्या हस्ते देवाला दान द्या.” असे हिरकणी जाधव यांना म्हणून त्या दोघा भामट्यांनी त्यांच्या जवळील पैसे काढून त्या पैशावर हिरकणा जाधव यांना त्यांच्या अंगावरील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने काढून ठेवण्यास सांगीले. यावर हिरकणा यांनी काही एक विचार न करता ते सुवर्ण दागिने त्यांच्या स्वाधीन केले. यावर त्या भामट्यांनी हातचालाखीने ते दागिने घेउन पोबारा केला. अशा मजकुराच्या हिरकणा जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या दोन घटना 

तुळजापूर : सुधीर अरुणराव जगदाळे, रा. तुळजापूर (खुर्द) यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 1950 ही दि. 17 ऑक्टोबर रोजी 21.15 ते 22.30 वा. दरम्यान तुळजापूर येथील गणेश लॉज समोर लावली असता अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुधीर जगदाळे यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : होर्टी, ता. तुळजापूर येथील महावितरणच्या 33 के.व्ही. उपकेंद्रावरील भांडार गृहातीचा दरवाजा दि. 19 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास उघड असल्याची अज्ञाताने संधी साधून आतील प्रत्येकी 1,000 ₹ किंमतीच्या 12 बॅटऱ्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या उपकेंद्रावरील कर्मचारी- सुनील सिध्दलिंग कानडे यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.