धाराशिव शहरात चोरीचे दोन गुन्हे दाखल  

 

धाराशिव  : फिर्यादी नामे- लोहार धनजय राजेंद्र, वय 40 वर्षे, रा. जिजाउ चौक, आदर्शनगर, ता.जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹  किंमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एए 8968 ही दि.13.08.2023 रोजी 05.30 ते 07.00 वा. सु. संजवनी मेडीकलच्या बाजूस असलेल्या वाघमारे यांच्या फुटवेअर दुकानाच्या बाजूला उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धनजय लोहार यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

धाराशिव  :फिर्यादी नामे- संजय अनंतराव मुळे, वय 45 वर्षे,रा. सुंबा ता. जि. उस्मानाबाद हा. मु. तांबरी विभाग उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 ए आर 9754  ही  दि.14.08.2023 रोजी 22.30 ते दि. 15.08.2023 रोजी 07.00 वा. सु. संजय मुळे यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय मुळे यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे- शुकुर गफुर मुज्जावर, वय 38 वर्षे, रा. खानापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे अंदाजे 10, 800 ₹ किंमतीच्या लियर अंडी देणारी पांढऱ्या रंगाच्या 36 कोंबड्या या दि. 14.08.2023 रोजी 10.45 ते 15.08.2023 रोजी 01.00 वा. सु. खानापूर शिवारात फॅन्टेशी पोल्ट्रीमधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या शुकुर मुज्जावर यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

 परंडा  :फिर्यादी नामे- मनोज हंबीरराव तनपुरे, वय 35 वर्षे,रा. खासापुरी 2 ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे अंदाजे 60,000 ₹ किंमतीचे -3 शेळ्या व बोकड -5 करडू -3  हे दि.13.08.2023 रोजी 12.00 ते दि. 14.08.2023 रोजी 05.30 वा. सु. मनोज तनपूरे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या मनोज तनपुरे यांनी दि.15.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.