धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : दि.23.03.2023 रोजी 00.00 ते दि.23.05.2023 रोजी 00.00  वा. सु. हतालाई तलावातील तरंगते कारंज्याचे साहित्य नोझल्स मोटारी, फोल्ड ड्रम केबल पंपाचे स्टार्टर एम.उस.ए. बी. डीपी एमसीबी टासमर म्युजिकल स्टिीम व इतर साहित्य जुने वापरते किंमत अंदाजे 9,00,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकृष्ण पांडुरंग शिंदे, वय 48 वर्षे, व्यवसाय- अभियंता यांत्रिकी उप विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद, रा. अंबाला हॉटेल तांबरी विभाग उस्मानाबाद हा. मु. घर नं नंबर 116 सीव्हींग अष्ट विनायक आपरमेंन्ट हंबीरे हॉस्पीटल्या बाजूला सांजा रोड उस्मानाबाद यांनी दि.09.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा : आरोपी नामे- दिलीप दादाराव सुर्यवंशी, वय 44 वर्षे, रा. मळगी, ता. उमरगा जि उस्मानाबाद यांनी आपल्या कब्जातील हायवा ट्रक क्र के. ए. 28 बी 5289 वाहनामध्ये अंदाजे 35,000₹ किंमतीची 5 ब्रास वाळू सह 10,00,000₹ किंमतीचा वाहतुकीसाठी वापरलेला हायवा ट्रक असा एकुण 10,35,000₹ किंमतीची हायवा मध्ये भरुन वाळू ही कोठुन तरी चोरी करुन तिचा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असताना उमरगा पोलीसांना मिळून आला.अशा मजकुराच्या उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस  हावलदार/18.06 बाबासाहेब बलभिम कांबळे यांनी दि.09.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.