धाराशिव  जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

वाशी  : फिर्यादी नामे- कल्याण रामभाउ उकरंडे, वय 60 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद यांचे गोजवाडा शिवार शेतगट नं 561 मधील बालाजी फायर वर्क्स या खुल्या कारखान्यातील खुल्या रुम मध्ये ठेवलेले अंदाजे 45,000₹ किंमतीचे कलर देण्यासाठी कारखान्यात तयार करुन ठेवलेले सुतळी बॉम्बचे अडीच प्लॅस्टीकचे पोते दि. 04.09.2023 रोजी 06.00 ते दि.05.09.2023 रोजी 09.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी कल्याण उकरंडे यांनी दि.05.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- शिवलाल रतनलाल गुजर, वय 40 वर्षे, व्यावसाय चालक रा. माणकपुरा, ता. कोठरी जि. भिलवाडा हे आंबाला राज्य हरियाणा येथुन व्ही. आर. एल लॉजिस्टीक कंपनी ट्रक क्रं के.ए.25 एए7859 यामध्ये माल भरुन गंगावती बल्लारी राज्य कर्नाटक येथे पोहच करण्यासाठी जात असताना दि.03.09.2023 रोजी सकाळी 05.00 ते 06.00 वा. दरम्यान वडगाव पाटी ते येडशी टोलनाका येथुन जात असताना अज्ञात व्यक्तीने चालत्या गाडीतील पाठीमागून चढून ट्रक मधील एकुण मालापैकी ओरीजनल ब्रॅन्ड कंपनीचे विविध रंगाचे टी. शर्ट असलेले 10 बॉक्स अंदाजे 15,120 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी शिवलाल गुजर यांनी दि.05.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

धाराशिव  :मयत नामे- गणपत नाना गाढवे, वय 65 वर्षे, रा.बार्शी नाका अदित्या पेट्रोल पंपापाठीमागे उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद हे दि.23.08.2023 रोजी 19.45 वा. सु. शेतकरी सेवा केंद्र जनाई हॉस्पीटल जवळ बार्शीनाका उस्मानाबाद येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात मोटरसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून गणपत गाढवे यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात गणपत गाढवे हे गंभीर जखमी  होवून उपचार दरम्यान मयत झाले.नमुद अज्ञात मोटरसायकल चालक हा अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास न नेता अपघात स्थळावरुन वसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी संतोष गणपत गाढवे, वय 45 वर्षे, रा. बार्शीनाका अदित्या पेट्रोल पंपापाठीमागे उस्मानाबाद ता.जि. उस्मानाबाद यांनी दि.05.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 अ सह मो.वा. का. कलम 184, 134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.