उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
आंबी : तांदुळवाडी, ता. परंडा येथील- संदीपकुमार आण्णासाहेब मुळूक यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो आय स्मार्ट मोटारसायकल क्र. एम.एच.25 ए.ए. 4298 ही दि.27.01.2023 रोजी 20.00 ते दि.28.01.2023 रोजी 08.00 वा. दरम्यान सोनाली हॉस्पीटल आनाळा येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संदीपकुमार मुळूक यांनी दि. 29.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : कल्पनानगर, कळंब येथील- याहीया महेबुब हन्नुरे यांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीची ज्युपीटर स्कुटर मोटारसायकल क्र. एम.एच.25 ए.यु. 5405 ही दि.20.12.2022 रोजी 23.00 ते दि.21.12.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान हन्नुरे यांच्या घरा समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या याहीया हन्नुरे यांनी दि.29.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन विठ्ठलनगर, तेर येथील- फुलचंद वामन पसारे यांना दि. 28.01.2023 रोजी 15.30 वा. सु. हिंगळजवाडी जाणारे रोडवर जि.प्र.शाळा समोर गावकरी- प्रकाश नाईकवाडी, बाळासाहेब नाईकवाडी, कृष्णा नाईकवाडी यांनी फुलचंद व त्यांची मुले यांना ठार मारण्याच्या उद्देशांनी प्रकाश यांनी फुलचंद यांच्या डोक्यात कत्तीने वार करून त्यास गंभीर जखमी केले. तर फुलचंद यांच्या बचावास आलेले त्यांची मुले नवनाथ व दादासाहेब यांना बाळासाहेब व कृष्णा यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने, काठीने मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फुलचंद पसारे यांनी दि.29.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307,324,323,504,506 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.