उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

तुळजापूर  : काटी, ता. तुळजापूर येथील- कालीदास देविदास शिंदे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची प्लॅाटिना मोटरसायकल  क्र.एम.एच.25 एव्ही 8433 ही दि.16.02.2023 रोजी 15.00 ते 15.30 वा. दरम्यान तुळजापूर ते लातूर जाणारे रोडलगत गजानन मेडीकल स्टोअर्स समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कालीदास शिंदे यांनी दि. 17.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : राळेसांगवी, ता. भुम  येथील- विलास जाधव, बाळु जाधव यांनी दि. 17.02.2023 रोजी 17.30 वा. सु. राळेसांगवी शिवारातील स्वत:चे शेतातील बेकायदेशीर रित्या चंदनाच्या झाडाची दोन लोखंडी वाकसाने तुकडे करुन चंदनाच्या झाडाचे लाकडाचा गाभा असलेले 5 तुकडे व सुगंधीत धलप्याचे लहान मोठे तुकडे असे एकुण 8 किलो  वजनाचे अंदाजे 13,200 ₹ किंमतीचा माल विक्री करण्याचे उद्देशाने  साठा करुन  स्वत:चे ताब्यात बाळगतांना मिळून आले. अशा मजकुराच्या एसडीपीओ कार्यालय भुम- पो.अंमलदार अजिनाथ तरंगे यांनी दि. 17.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह भा.वन.कायदा कलम 41, 41, (1), 41(2)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.