उस्मानाबाद जिल्हयात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

ढोकी  : गोवर्धनवाडी, ता. उस्मानाबाद येथील- श्रीकांत रावसाहेब मुळे यांचे गोवर्धनवाडी तेर जाणारे रोडलगत असलेले पवणराजे ॲग्रो प्रोडयुसर कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून अंदाजे 1,93,200 ₹ किंमतीचे सोयाबीन चे 51 पोते त्यामध्ये 34.50 क्विंटल वजनाचे दि.11.02.2023 रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या श्रीकांत मुळे यांनी दि. 15.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

मुरूम  : कातपुर, ता. लातुर  येथील- आदेश महादेव जवादे यांचे रोख रक्कम 2000 ₹, पार्सलचे पैसे, मोबाईल फोन असा एकुण 20,551  ₹ किंमतीचे साहित्ये दि.13.02.2023 रोजी 20.00 वा. दरम्यान मुरळी शिवारातील धनराज जाधव यांचे शेताजवळ रोडवर बेरवाडी, ता. उमरगा येथील- गंगाराम मंडले, संतोष गुराळे यांनी आदेश यास तलवारीचा धाक दाखवून तलवारीच्या मुठीने मारहान करून जबरीने लटून नेला. अशा मजकुराच्या आदेश जवादे यांनी दि. 15.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394,34 सह शस्त्र कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे