धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

धाराशिव  : नेहरु चौक, उस्मानाबाद येथील- कॅलास दत्तात्रय घोडके,वय 52 वर्षे,यांचा डांबर प्लॅट वरील लुबी कंपनीचा 5 एचपीचा सबमर्सिबल पंप, केबल, इलेक्ट्रीक बोर्ड, असा एकुण 37,500 ₹ किंमतीचे साहित्य हे दि.30.06.2023 रोजी 22.00 ते 01.07.2023 रोजी 02.00 वा. सु सोनेगाव शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कैलास घोडके यांनी दि.04.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


तामलवाडी  : सांगवी काटी, ता. तुळजापूर येथील- विश्वास मधुकर मगर, वय 35 वर्षे,यांचा सांगवी माळुंब्रा साठवण तलावातील विद्युत पंप, केबल,स्टार्टर असा एकुण 8,600 ₹ किंमतीचे साहित्य हे दि.03.05.2023 रोजी 19.00 ते 04.05.2023 रोजी 05.00 वा. सु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विश्वास मगर यांनी दि.04.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


फसवणूक

धाराशिव  : गुंजोटी, जा. उमरगा येथील- महादेव चिंतामणी खोत यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 04.06.2023 रोजी 14.30 ते 05.06.2023 रोजी 19.00 वा. सु.  ऑनलाईन शॉपिंग ॲपचे कस्टमर नंबर 9381602540 चे धारक राहुल शर्मा यांनी महादेव यांच्या भ्रमणध्वनीवरुन कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या शर्मा यांनी अकाउंट नंबर तसेच ईमेल आयडी महादेव यांचे कडून घेउन त्यांना एनी डेस्क ॲप डाउनलोड करण्यास लावून पिन नंबर चोरुन पाहून त्यांचे बॅक खाते मधून 1,00,000 ₹ ऑनलाईन पध्दतीने फसवणूक केली आहे. त्यांनी दि.04.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66(सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.