उस्मानाबाद जिल्ह्यात दोन चोरीचे आणि दोन मारहाणीचे गुन्हे दाखल 

 

येरमाळा : दिलीप शिवलींग जाधव, रा. बारामती, जि. पुणे हे दि. 14 ऑक्टोबर रोजी 17.30 वा. सु. त्यांच्या पत्नीसह येरमाळा येथील येडेश्वरी मंदीरात दर्शनासाठी गेले असता अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन दिलीप जाधव यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी चोरुन नेली. अशा मजकुराच्या जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : मुक्रम शेख, रा. लोहारा हे त्यांची हिरो होंडा प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 5614 ही दि. 08 ऑक्टोबर रोजी 09.00 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, लोहारा येथील एका दुकानासमोर लाउन दुकानात खरेदीसाठी गेले असता दरम्यान त्यांची नमूद मो.सा. अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शेख यांनी दि. 14 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

उमरगा  : अनिलकुमार भालकी, रा. राजेश्वर, ता. बस्वकल्याण, जि. बिदर हे दि. 13 ऑक्टोबर रोजी 12.00 वा. सु. हुमनाबाद- तुहजापूर जाणाऱ्या बस क्र. के.ए. 38 एफ 1177 मधून प्रवास करत होते. नमूद बस तलमोड टोल नाका येथे आली असता तांत्रीक अडचणीमुळे बस टोल नाक्यावर अर्धा तास थांबवून ठेवली होती. यावेळी भालकी यांनी टोल नाक्यावरील लोकांना बस सोडण्यास विनंती केली असता तेथील 7 अनोळखी पुरुषांनी भालकी यांना शिवीगाळ करुन, प्लास्टिक पाईपने मारहान केली. तसेच भालकी यांच्या बचावास आलेल्या लोकांनाही मारहान केली. अशा मजकुराच्या अनिलकुमार भालकी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : सुधिर बनसोडे, रा. कल्पनानगर, कळंब हे दि. 14 ऑक्टोबर रोजी 18.15 वा. सु. त्यांच्या कॉलनीतून पायी जात होते. दरम्यान गावकरी- दिपक रोहिदास गायकवाड, संजय गायकवाड, राहीदास गायकवाड, सतपाल बनसोडे अशा चौघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरून सुधिर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, बॅटने मारहान करुन डोळ्यात चटणी टाकून जखमी केले. अशा मजकुराच्या सुधिर बनसोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.