उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

 

तुळजापूर  : सुहास सुरेश गोरे, रा. संगमनेर, ता. बार्शी यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीएक्स 2947 ही दि. 16 सप्टेंबर रोजी 14.30 ते 16.30 वा. दरम्यान तुळजापूर येथील हॉटेल वरदायनी समोर लावली असता अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुहास गोरे यांनी दि. 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : संगीता शिवाजी साबळे, रा. विजयनगर, भुम यांच्या भुम गट क्र. 98 मधील शेतातील काढणीस आलेले सोयाबीनचे पिक पारधी पिढी, भुम येथील गोविंद बाबु काळे, छाया काळे, सुरेखा काळे या तीघांनी दि. 20 सप्टेंबर रोजी 11.00 वा. पुर्वी कापून ट्रॅक्टरमधून चोरुन नेले. अशा मजकुराच्या साबळे यांनी दि. 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

मारहाण 

उस्मानाबाद : ईस्माईल उमर सय्यद, रा. काजळा, ता. उस्मानाबाद हे दि. 18 सप्टेंबर रोजी 12.30 वा. सु. काजळा शिवारातील हॉटेलमध्ये असतांना गावकरी- सचिन पोपट क्षिरसागर यांनी जेवण मागीतले. यावर ईस्माईल यांनी हॉटेल बंद असल्याचे सांगताच सचिन यांनी चिडून जाउन ईस्माईल यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व जवळच पडलेल्या काचेच्या बाटली ईस्माईल यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या ईस्माईल यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : पारधी वस्ती, सांजा येथील सचिन काळे, विमल काळे, निर्मला काळे, शामल पवार या चौघांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 19 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. वस्तीवर सांजा येथील आगतराव धोंडीबा सावंत यांना शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड फेकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सावंत यांनी दि. 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.