उस्मानाबादेत चोरीच्या स्मार्टफोनसह दोघे अटकेत

 

उस्मानाबाद : ईरफान शेख, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद यांसह गावातील 7 व्यक्ती दि. 30- 31.05.2021 दरम्यानच्या रात्री कनगरा गट क्र. 209 मधील शेतातील पत्रा शेडसमोर झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या उषाचे एकुण 7 स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावरुन शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 91 / 2021 हा नोंदवला आहे.

            तपासादरम्यान उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याच्या पोउपनि- किरवाडे यांच्या पथकाने तांत्रिक अभ्यास केला असता या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या स्मार्टफोनपैकी 2 स्मार्टफोन हे सांजा रोड, उस्मानाबाद येथील सुरज बजरंग भिसे व संतोष गोवर्धन धोत्रे यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आले. या प्राप्त माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- शेळके, धनंजय कवडे, पोकॉ- सुनिल मोरे, सर्जे यांनी सांजा रोड येथून काल दि. 09 नोव्हेंबर रोजी चोरीच्या स्मार्टफोनसह नमूद दोघांना ताब्यात घेउन त्यांस बेंबळी पो.ठा. च्या ताब्यात दिले असून उर्वरीत तपास बेंबळी पोलीस करत आहेत. 

चोरीचे तीन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील संजय पंढरीनाथ सौदागर हे त्यांच्या पत्नीसह दि. 08- 09.11.2021 दरम्यान रोहीदास कॉलनी, उस्मानाबाद येथील त्यांचे मेहुने बालाजी जठार यांच्याकडे मुक्कामास होते. बालाजी जठार यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीचा पाठीमागील दरवाजा दि. 09.11.2021 रोजी रात्री 03.15 वा. पुर्वी अज्ञात व्यक्तीने तोडून संजय सौदागर यांच्या पत्नी यांच्या उशाच्या पर्समधील 150 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, एक पैंजन जोड व 1,50,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली व रिकामी पर्स स्वयंपाक खोलीच्या पाठीमागील बाजूस टाकली. अशा मजकुराच्या संजय सौदागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : सावरगाव, ता. भूम येथील प्रविण बबन कांबळे हे दि. 08.11.2021 रोजी 10.30 ते 16.00 वा. दरम्यान बाहेर गावी गले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 30 ग्रॅम वनाचे चांदिचे दागिने व 75,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रविण कांबळे यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : सौंदणा (अंबा), ता. कळंब येथील नागेश गोरखनाथ पालकर यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 6083 ही दि. 08.11.2021 रोजी 20.00 वा. आपल्या घरासमोर लावली होती. दि. 09.11.2021 रोजी 01.00 वा. सु. ती मो.सा. त्यांना लावल्याजागी न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या नागेश पालकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.