उस्मानाबाद जिल्ह्यात बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण 

 

उस्मानाबाद  : एक 12 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 28.01.2022 रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरासमोरील अंगनात असतांना एका वाहनात आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आजीने दि. 29 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाणीच्या दोन घटना 

नळदुर्ग  : मुलतान गल्ली, नळदुर्ग येथील मुस्तफा फकरोद्दीन शेख हे दि. 28.01.2022 रोजी 20.30 वा. सु. नळदुर्ग येथील रस्त्याने जात होते. यावेळी गावकरी- गजानन कुलकर्णी यांनी पुर्वीच्या वादावरुन मुस्तफा शेख यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. या मारहानीत मुस्तफा यांच्या तोंडावर बुक्की लागल्याने त्यांचा एक दात पडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या मुस्तफा शेख यांनी दि. 29 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : लक्ष्मीनगर, भुम येथील मनिषा महेश जाधव यांसह त्यांच्या कुटूंबातील महेश, गणेश, महादेवी जाधव व पुनम बल्लाळ यांच्या गटाचा गावकरी- पुनम अनिल साठे यांसह त्यांच्या कुटूंबातील अनिल, सुरज, संभाजी साठे व कांचन ताटे, अर्चना शिंदे, माया चव्हाण, रोहन ताटे, कौसाबाई यांच्या गटाशी पुर्वीच्या वादातून दि. 28.01.2022 रोजी 17.30 वा. सु. राहत्या गल्लीत हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन ठार लाथाबुक्क्यांनी, विट, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.

            अशा मजकुराच्या मनिषा जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 143, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत आणि पुनम साठे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत असे 2 गुन्हे दि. 29 जानेवारी रोजी नोंदवले आहेत.