तुळजापुरात छम छम ! गजगा डान्सबारवर छापा !!

 २५  बारबाला  , ६४  ग्राहक पोलिसांच्या ताब्यात 
 

तुळजापूर  : नळदुर्ग रोडवरील  हंगरगा येथील ‘गजगा डान्सबार’ मध्ये गेल्या काही दिवसापासून बारबालांचा  'छम - छम ' सुरु होता. पोलिसांनी या डान्स बारवर छापा मारून  २५  बारबाला  , ६४  ग्राहकाना  ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील हंगरगा येथील ‘गजगा डान्सबार’ हा वेळेच्या निर्बंधांचे उल्लंघन करुन जास्त वेळ चालत असल्याचे, नृत्यांगना अश्लील नृत्य करत असल्याचे तसेच अवैध रीत्या मद्य वितरीत होत असल्याची खबर पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांना मिळाली होती. त्या आधारे कळंब येथील सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, तुळजापूर पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे- पाटील, तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि-अजिनाथ काशीद यांच्यासह पुरुष व महिला पोलीस अंमलदारांच्या पथकाने दि. 29.11.2021 रोजी 01.00 वा. त्या डान्सबारवर छापा टाकला.

            यावेळी कोविड- 19 संबंधी प्रशासकीय मनाई आदेशांचे उल्लंघन होत असून 25 नृत्यांगणांसह 64 ग्राहक बिभत्स हावभाव करत असल्याचे व विदेशी दारु- बियरचा 3,20,410 ₹ किंमतीचा अवैध साठा असल्याचे आढळले. यावरुन बार मालक- तानाजी लकडे, बार व्यवस्थापक- सागर कदम यांसह नमूद नृत्यांगणा व ग्राहक यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 268, 269, 294, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 33, महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह बार रुममधील अश्लील कृत्यावर प्रतिबंध कायदा कलम- 8, संसर्गजन्य रोग प्रसार कायदा कलम- 3, महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम कलम- 65 अंतर्गत गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात नेांदवला आहे. तसेच पोलीस अधीक्षकांनी नमूद नृत्यांगणांचे समुपदेशन केले असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले जाणार आहे.