परंडा तालुक्यात थरार : चार चाकी वाहनावर  गोळी झाडून लुटमारीचा प्रयत्न 

 

परंडा  : करंजा, ता. परंडा येथील- नानासाहेब भगवान पवार, वय 35 वर्षे, हे दि.25.05.2023 रोजी 23.00 वा.सु. पीठापुरी गावचे शिवारातील कॅनलजवळ कारंजा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन महिंद्रा थार गाडी क्र एमएच 12 टी. व्ही. 9696 ने जात होते दरम्यान अनोळखी तिन व्यक्तीनी लुटमार करुन जिवे मारण्याचे उद्देशाने पिस्टलच्या आकाराच्या छोट्या बंदुकीने नानासाहेब यांचे गाडीवर समोरील काचेवर गोळी झाडुन पसार झाले. अशा मजकुराच्या नानासाहेब पवार यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 393, 511, 34,सह भा. ह. का. कलम 3/25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव -  तेरखेडा, ता. कळंब येथील- इकबाल मुजावर, अली मुजावर, बद्रु मुजावर, गुड्डू मुजावर, साहील मुजावर, आन्य 5 या सर्वांनी  नारळ फोडण्याच्या कारणा वरुन दि.25.05.2023 रोजी 20.00  ते 21.00 वा. दरम्यान गडदेवदरी देवस्थान येथे गैरकायद्याची मंडळी गाझी मैदान, दर्ग्याच्या जवळ, उस्मानाबाद येथील- असलम इब्राहीम मुजावर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड व लाकडी काठीने मारुन जखमी केले.  असलम यांच्या यांच्या बचावास आलेले मुबारक मुजावर, गुलाब मुजावर, इम्रान मुजावर यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने रॉडने मारहाण  करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या असलम मुजावर यांनी दि.26.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-143, 147,  148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.