नळदुर्गमध्ये डिझेल चोरी प्रकरणी तीन जण ताब्यात 

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 
 

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नळदुर्ग पो.ठा. हद्दीत दि. 07.07.2023 रोजी 02.45 वा. सु. नळदुर्ग पेट्रोलिंगला असताना गोलाई चौक नळदुर्ग येथे बरायणी जि. बागलूर राज्य बिहार येथील- शहबाज कलीम शेख, वय 28 वर्षे,  तर मुलतान गल्ली तुळजापूर येथील-बाबु आयुब शेख, वय 30 वर्षे, तर रहीम नगर नळदुर्ग येथील- औदुंबर सुभाष काटे, वय 24 वर्षे, हे तिघे  रिक्षा क्र एमएच 25 ए.के. 0492 मध्ये 25 लीटर डिझेल असा एकुण 2,02,425 ₹ किंमतीचे डिझेल कुठुन तरी चोरी केली त्या बाबत कुठल्याही प्रकारची मालकी हक्काचे कागद पत्र सादर न करता. हे बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना गुन्हे शाखेच्या पथकास आढळले. यावर पथकाने शहाबाज, बाबु, औदुंबर यांना ताब्यात घेउन त्यांच्या जवळील रिक्षा व डिझेल जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुंबई पोलीस कायदा कलम- 124 अंतर्गत नळदुर्ग पो ठा येथे  गुन्हा नोंदवला आहे.

  चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 नळदुर्ग  : सलगरा दिवटी, ता. तुळजापूर येथील- बालाजी बाब्रुवान गुंजकर, वय 26 वर्षे, यांचे राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.07.07.2023 रोजी 11.00 ते 15.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील  48 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख रक्कम  11,000 असा एकुण 1,85,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी गुंजकर यांनी दि.07.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


ढोकी : महादेव गल्ली, ढोकी येथील- महादेव शंकर लंगडे, वय 62 वर्षे, यांची ढोकी  शिवारातील शेतातील बांधलेली एक गाय  एक म्हैस व जयराम ढेरे रा. ढोराळा यांची घोगरेवाडी शिवारातील शेतातील बांधलेली एक गाय व एक म्हैस असा एकुण 70,000 ₹ किंमतीच्या दोन गाय व दोन म्हैस हे दि.05.07.2023 रोजी 20.30 ते 06.07.2023 रोजी 06.00 वा. सु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव लंगडे यांनी दि.07.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.