उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 

येरमाळा : उस्मानाबाद येथील नितीन मुंडे हे दि. 25.12.2021 रोजी 21.25 वा. सु. चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याजवळील पर्यायी रस्त्याने पत्नीसह पायी जात होते. यावेळी चार अज्ञात पुरुषांनी मुंडे पती- पत्नीस चाकूचा घाक दाखवून त्यांच्या अंगावरील सुवर्ण दागिने, रोख रक्कम व दोन स्मार्टफोन असा सुमारे 99,000 ₹ किंमतीचा माल लुटून पलायन केले. अशा मजकुराच्या नितीन मुंडे यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उंबरेकाठा, उस्मानाबाद येथील- ज्योतीराम रामेश्वर पांचाळ यांची स्टार प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 8049 ही दि. 20.12.2021 रोजी 20.45 वा.सु. उस्मानाबाद येथील सीटी हॉटेलसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या ज्योतीराम पांचाळ यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : उमरगा येथील सुबोधकुमार सुभाष वाघमारे यांच्या गुगळगाव गट क्र. 116 / 8 /2 मधील शेत तळ्यातील 5 अश्वशक्ती क्षमतकेचा पानबुडी विद्युत पंप दि. 22- 23.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुबोधकुमार वाघमारे यांनी दि. 26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


तंबाखुजन्य पदार्थांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : कोराळ शिवारातील रस्त्यावर मुरुम पोलीसांचे पथक काल दि. 26.12.2021 रोजी 07.00 वा. सु. गस्तीस असतांना संशयावरुन कार क्र. एम.एच. 02 केए 9288 ची झडती घेतली. यावेळी कार चालक- यय्याखान हमीद कमाल, रा. दाळींब, ता. उमरगा हे त्या कार मधून 35,550 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ वाहून नेत असतांना आढळले. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोलीस अंमलदार- शंभुदेव रणखांब यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188,272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.