उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 

वाशी : उस्मानाबाद येथील बांधकाम कंत्राटदार- श्री. सखाराम आदिनाथ डोके यांच्या सोन्नेवाडी शिवारातील गट क्र. 33/2 मधील डांबर मिश्रण संयंत्राच्या आवारातील जॉन डीयर कंपनीच्या हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरसह हिरव्या रंगाचा एका ॲक्सलचे (दोन चाकी) ट्रेलर दि. 12- 13.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सखाराम डोके यांनी दि. 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी   : अनाळा, ता. परंडा येथील राहुल भाऊसाहेब जाधव हे बाहेर गेले असता दि. 15.11.2021 रोजी 14.30 वा. सु. त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 35 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 50,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या राहुल जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : कोरेगाववाडी, ता. उमरगा येथील वैजिनाथ निवृत्ती सोलंकर यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1636 ही दि. 13- 14.11.2021 दरम्यानच्या रात्री सोलंकर यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सोलंकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत

उस्मानाबाद  -  उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. 293 / 2019 या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- बाबू लिंबा काळे, रा. पाधी पिढी, पळसप हा गेली 2 वर्षे पोलीसांना तपासकामी  हवा होता. तो गावी परतल्याची बातमी मिळताच उस्मानाबाद (ग्रा.) पो. ठा. च्या सपोफौ- किशोर रोकडे, पोना- समाधान वाघमारे, पोकॉ- खैरे, ईरफान कुरेशी यांच्या पथकाने बाबू काळे यास दि. 14 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरुन अटक केली आहे.