धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

मुरूम, वाशी, शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
 

मुरुम  :फिर्यादी नामे- युवराज रामचंद्र हिरमुखे, वय 50 वर्षे, रा. भुसणी, ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 95,000₹ किंमतीची एक मुरा म्हैस व एक वगार असे दोन म्हैस या दि.29.09.2023 रोजी 23.00 ते दि. 30.09.2023 रोजी 05.00 वा. सु. भुसणी येथील शेत गट नं 231 मधील पत्रयाचे शेडमधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या युवराज हिरमुखे यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  :दि.06.09.2023  ते दि. 07.09.2023 रोजी 07.00 वा. सु. विंड वल्ड इंडिया लिमीटेड कंपनीचे पवन चक्कीचे प्रोजेक्ट येथुन ईसरुप शिवार येथील पवनचक्कीचे कंट्रोल कॅबीनेट 1 नग व पॉवर कॅबिनेट 3 नग असा एकुण 70,000₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आण्णा रामा छत्रे, वय 45 वर्षे, व्यवसाय - खाजगी नोकरी रा. ईसरुप ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  :फिर्यादी नामे- आश्रुबा अंकुश जाधवर, वय 42 वर्षे, रा. देवळाली, ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 90,000₹ किंमतीच्या दोन काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी ह्या दि.28.09.2023 रोजी 11.30 ते 24.00 वा. सु. ढोराळा शिवारातील शेतगट नं 127 मधील गोठ्यामधुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या आश्रुबा जाधवर यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.