धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

नळदुर्ग  : फिर्यादी नामे- संतोष बाबुराव पांढरे, वय 46 वर्षे, रा.शहापूर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची स्कुटी क्र एमएच 25 एएक्स 8171 ही दि.25.08.2023 रोजी 19.00 वा. सु. दि.26.08.2023 रोजी 07.00 वा. सु. संतोष पांढरे यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी संतोष पांढरे यांनी दि.12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- मेघराज मारुती जाधव, वय 31 वर्षे, रा. छत्रपती शिवाजी चौक,वडार गल्ली, उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो होंडा फॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 1634 ही दि.08.09.2023 रोजी 14.30 ते  15.30 वा. सु. आडत लाईन समोरील राजधानी हॉटेल उस्मानाबाद समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी मेघराज जाधव यांनी दि.12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : फिर्यादी नामे- दशरथ चिमनाजी जाधव, वय 75 वर्षे,रा. मस्सा खं ता.कळंब जि. उस्मानाबाद  यांचे शेत गट नं 931 मधील विहीरीवरुन जे के कंपनीचा 5 एचपी चा पारेशन विरहीत सौर कृषी पंप अंदाजे 12,000₹ किंमतीचा हा दि. 05.09.2023 रोजी 18.00 ते दि.08.09.2023 रोजी 11.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी दशरथ जाधव यांनी दि.12.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.