उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

उमरगा  : कवठा, ता. उमरगा  येथील- माधव सोनवणे  यांचा अंदाजे 12,000 ₹ किंमतीचा मोबाईल फोन हा दि. 08.02.2023 रोजी 14.30 वा. सु. भारत फायनान्स ऑफीस  शास्त्री नगर उमरगा येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या माधव सोनवणे  यांनी दि. 09.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : तांदुळवाडी, ता. वाशी  येथील- महादेव गायकवाड यांचे अंदाजे 10,000 ₹ किंमतीचे लोखंडी टायर बैलगाडीचा आकसल हा दि.08.02.2023 रोजी 23.00 ते दि 09.02.2023 रोजीचे  04.00वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या महादेव गायकवाड यांनी दि. 09.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : गणेश नगर, मुरूम  येथील- प्रकाश प्रभाकरराव जिंतुरकर धंदा – नौकरी (एमएसईबी) हे मुरुम शहरविभागातील एल टी लाईनची पाहणी करण्यासाठी गेले असता सर्वे नं 295/2 मधील पोलवरील एल टी कंडक्टर वायर अंदाजे 42,000 ₹ किंमतीचे 1500 फुटाची ही दि.02.02.2023 रोजी 10.00 ते वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. अशा मजकुराच्या प्रकाश जिंतुरकर यांनी दि. 09.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.