धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

परंडा  :सोनगिरी, ता. परंडा येथील- संदीप गुंडूसिंह ठाकूर, वय 28 वर्ष यांचे दि.27.06.2023 रोजी 19.00 ते दि.28.06.2023 रोजी 06.00 वा. सुमारास भिमसिंह गुलाबसिंह ठाकुर यांचे शेत गट नं 55 मधील शेतातुन खासगांव शिवार येथुन अंदाजे 30,000 ₹ किंमतीची गाय ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संदीप ठाकुर यांनी दि.28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : जिओ कंपनी प्रताप टेकनोचे तुळजापूर येथील टॉवरचे  5 जी राउटर कार्ड अंदाजे 22,000 ₹ किंमतीचे हे दि.26.06.2023 रोजी 16.10 वा. सु टॉवर क्र.9054 तुळजापूर खुर्द शिवारातुन अशा मजकुराच्या टेकनिशन-दादासाहेब शिवाजी शिंगटे मेडसिंगा, ता. उस्मानाबाद यांनी दि.28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  :सांजा रोड, उस्मानाबाद येथील- संजय धर्मराज पवार, वय 50 वर्ष हे दि.28.06.2023 रोजी 18.00 वा.दरम्यान आईसाहेब सुपर मार्के समोर हाडको तुळजापूर येथे छोटा हत्ती गाडी मध्ये ड्रायव्हर समोर पायापाशी ठेवलेली हॅण्डबॅग मधील रोख रक्कम 1,77,010 ₹ ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या संजय पवार यांनी दि.28.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.