मुरूम पोलीस स्टेशन अंतर्गत हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 

मुरुम  : केसरजवळगा, ता. उमरगा येथील- सुभाष भोज, गुणमु भोज, निकुल भोज, बसू भोज, श्रीकांत भोज, सिध्दू भोज यांनी पाण्याच्या कारणावरून दि.05.06.2023 रोजी 11.00 वा.सु.केसरजवळगा येथे गावकरी- वसिम अक्रम अफसर मुल्ला यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुह्राडीने, हंटर, चाकूने मारहान  करत असताना त्यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या बहिण तेहसीन पठाण यांच्या हातावर चाकु लागून गंभीर जखमी झाल्या. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वसिम अक्रम मुल्ला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 05.06.2023 रोजी नोंदवला आहे.

बेळंब तांडा, ता. उमरगा येथील- भानुदास राठोड,नामदेव राठोड, सुरेश राठोड, अशोक राठोड, आकाश राठोड, अन्य 7 या सर्वांनी दुकानाला जाण्याचे कारणावरून दि.04.06.2023 रोजी 19.30 वा.सु.बेळंब तांडा येथे रवि पवार यांचे दुकानासमोर गावकरी- बाबु चव्हाण यांचा मुलगा नामे अनिल बाबु चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहान  करत असताना त्यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या चुलत भाउ श्रीकांत यासही लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाबु चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 05.06.2023 रोजी नोंदवला आहे.

बेळंब तांडा, ता. उमरगा येथील- श्रीकांत चव्हाण, रमेश चव्हाण, अशोक चव्हाण, बाबु चव्हाण, कमलाकर चव्हाण, अन्य 7 या सर्वांनी विनाकारण शिव्या दिल्याचे कारणावरून दि.04.06.2023 रोजी 20.00 वा.सु.बेळंब तांडा येथे गावकरी- भानुदास मानु राठोड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करत असताना त्यांच्या बचावास आलेल्या त्यांचा भाउ, नामदेव, मुलगा निखील,  व पत्नी जयश्री, बहिण निर्मला, भाच्ची कवीता राठोड यांसही लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भानुदास राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 05.06.2023 रोजी नोंदवला आहे.

अंबरनगर, ता. उमरगा येथील- रोहीत जाधव, सुमित राठोड, ज्ञानेश्वर राठोड, जीवन राठोड केतन जाधव या सर्वांनी लग्नातील भांडणाच्या कारणावरून दि.04.05.2023 रोजी 19.30 वा.सु.अंबरनगर शिवारातील शंकर जाधव यांचे शेतात गावकरी-प्रविण जाधव यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, हंटरने मारहान मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रविण जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 05.06.2023 रोजी नोंदवला आहे.