उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 

भुम  : भुम येथील समाधान उत्रेश्वर कदम यांनी दि. 12 ऑक्टोबर रोजी 11.00 वा. सु. गावकरी- विजय चंद्रकांत बाराते यांना रेड्याच्या टकरी बघायला चलण्यास सांगीतले. बाराते यांनी येण्यास नकार देताच चिडून जाउन कदम यांनी त्यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजय बाराते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : अशोक श्रीपती हाजगुडे, वय 42 वर्षे, रा. किणी, ता. उस्मानाबाद हे दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री किणी शिवारातील त्यांच्या हॉटेलसमोर झोपले असता 01.30 वा. सु. आठ अनोळखी पुरुषांनी तेथे जाउन अशोक यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने माहान केली. यावेळी अशोक यांच्या बचावास आलेल्या रविंद्र व जिवन हाजगुडे यांनासही मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अशोक हाजगुडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : गणी सिराज शेख, रा. अंबेजवळगा यांचे शेत गावकरी- हिरामण बब्रुवान राठोड यांनी बटईने केले होते. त्या व्यव्हारातील शेख यांच्याकडे राहिलेले पैसे दि. 11 ऑक्टोबर रोजी अंबेजवळगा शिवारात हिरामण राठोड यांनी मागीतले असता गणी शेख यांसह शाहीद शेख यांनी राठोड यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच राठोड यांचे हातपाय बांधुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या हिरामण राठोड यांनी दि. 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

परंडा : अमोल प्रकाश झिरपे, रा. कार्ला, ता. परंडा हे दि. 08 ऑक्टोबर रोजी 19.30 वा. सु. पखानापुर फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 3401 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने पिकअप क्र. एम.एच. 25 एजे 0372 हा निष्काळजीपने चालवून झिरपे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने या अपघातात झिरपे हे गंभीर जखमी होउन त्यांच्या मो.सा. चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या झिरपे यांनी दि. 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.