उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोऱ्या 

 

येरमाळा :तुळजापूर ते सवाई माधवपूर जाणारा मालवाहू ट्रक क्र. आर.जे. 19 जीई 3888 हा दि. 31.10.2021रोजी 23.05 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर तेरखेडा येथील लक्ष्मी पारधीपिढी परिसरात आला असता ट्रकची गती कमी झाल्याची संधी साधून एक अज्ञात पुरुष पाठीमागील बाजूने ट्रकवर चढला. हा प्रकार चालकास समोरील आरशात दिसताच चालकाने थोड्या अंतरावरसुरक्षीत जागा पाहून एका पेट्रोलीयम विक्री केंद्रात ट्रक थांबवला.

 यावेळी ट्रकच्या हौद्याचे टारपोलीन फाडून हौद्यातील एकुण 21,450 ₹ किंमतीची प्रत्येकी 50 कि.ग्रॅ.वजनाची 13 साखरेची पोती धावत्या ट्रक मधून चोरीस गेल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.अशा मजकुराच्या ट्रक चालक- सोहनलाल फुखाराम, रा. राजस्थान यांनी दि. 01.11.2021रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

नळदुर्ग  :अशोक गुरुनाथ वागदरे, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर यांची आई व मुलगी या दोघी दि. 31.10.2021रोजी 23.00 वा. सु. घरात झोपलेल्या होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने घराची कडी उघडून  घरातील कपाटातील 20 ग्रॅम सुवर्ण दागिने व एक भ्रमणध्वनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या अशोक यांनी दि. 01.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

अंबी :शेळगाव येथील त्रिंबक शेवाळे हे दि. 31.10.2021 रोजी 23.00 वा. कुटूंबीयांसह घरात झोपलेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने घराची कडी उघडून घरातील कपाटात ठेवलेले 112 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या त्रिंबक शेवाळे यांनी दि. 01.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.