उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीची घटना 

नळदुर्ग, उस्मानाबाद, ढोकी, कळंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल 
 

नळदुर्ग  : माणिक विश्वनाथ शिवकर, रा. नळदुर्ग हे दि. 06- 22 सप्टेंबर दरम्यान कुटूंबीयांसह बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 7 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत महेश माधव सोलंकर, रा. लोहगाव, ता. तुळजापूर यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 13 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व पासपोर्ट चोरुन नेला. तसेच महेश यांचे मामा- काशीनाथ शेंडगे यांची एक म्हैस व बबलु चव्हाण यांच्या पाच शेळ्या व दोन बोकड चोरुन नेले. अशा मजकुराच्या महेश सालंकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : विद्या सतिश जेवे, रा. गणेशनगर, येडशी या कुटूंबीयांसह दि. 23 सप्टेंबर रोजी राहत्या घरात झोपलेल्या असतांना रात्री 03.00 वा. सु. तीन अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराच्या जिन्याची जाळी कट करुन घरात प्रवेश करुन विद्या यांसह त्यांच्या कुटूंबीयांना चाकू, गजाने धाक दाखवून कपाटातील 170 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 6,10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विद्या जेवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : भगवान सुरेश टेळे, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची टीव्हीएस मो.सा. क्र. एम.एच. 14 एचटी 9120 ही दि. 22 सप्टेंबर रोजी 23.00 वा. सु. आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने अज्ञाताने चारुन नेली आहे. अशा मजकुराच्या टेळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : रामा थोरात, रा. मांगवडगाव, ता. केज यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो. मो.सा. क्र. एम.एच. 44 एच 5359 ही दि. 11 सप्टेंबर रोजी 13.00 ते 13.45 वा. दरम्यान कळंब येथील बागवान चौकातील कापड दुकानासमोर लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या थोरात यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.