उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, फसवणूक, मारहाण गुन्हे दाखल 

 

बेंबळी : तोरंबा ग्रामस्थ- विठ्ठल निवृत्ती बागल यांच्या करजखेडा येथील आशीर्वाद मंगलकार्यालयातील 32 पोती सोयाबीन व गावकरी- रमेश आदटराव यांच्या शेतातील तुषारसिंचन संचाचे 7 नोजल दि. 12- 13.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विठ्ठल बागल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380, 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : लोहारा (बु.), ता. लोहारा येथील वैजिनाथ विश्वनाथ जट्टे यांनी त्यांचा अशोक लेलॅन्ड टँकर गावातील विश्वेकर पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्रावर दि. 10.11.2021 रोजी 00.30 ते 07.00 वा. दरम्यान लावला होता. दरम्यान अज्ञात व्यक्त्तीने त्या टँकरची डिस्कसह तीन चाके चोरुन टँकरच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या वैजिनाथ जट्टे यांनी दि. 13 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
फसवणूक

नळदुर्ग  : बिरु दगडु घोडके, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर व पांडुरंग शिवमुर्ती भुजबळ हे दोघे दि. 08.11.2021 रोजी 15.00 वा. सु. नळदुर्ग येथील एसबीआय एटीएममध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी त्या दोघांना पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी पुरुषाने मदतीचा बहाना करुन त्या दोघांचे डेबिटकार्ड घेउन त्या दोघांना त्यांच्याच डेबिट कार्डच्या रंगसंगतीचे दुसरे डेबिट कार्ड दिले. यानंतर 16.00 वा. सु. बिरु घोडके यांना त्यांच्या बँक खात्यातून 49,888 ₹ रक्कम कपातीचा व पांडुरंग भुजबळ यांना त्यांच्या बँक खात्यातून 37,300 ₹ कपातीचा बँकेचा लघु संदेश प्राप्‍त झाला. अशा मजकुराच्या बिरु घोडके यांनी दि. 13 नोंव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण 

लोहारा  : राजेगाव, ता. लोहारा येथील धनराज रावसाहेब पाटील यांसह त्यांची दोन मुले सुजर व धिरज यांनी शेत मशागतीच्या कारणावरुन दि. 12.11.2021 रोजी 17.00 वा. सु. संदीप चंद्रकांत कोटे, रा. किल्लारी, औसा यांना त्यांच्या राजेगाव येथील शेतात शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोटे यांच्या वाहनाच्या खिडकीचा काच दगडाने फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या संदीप कोटे यांनी दि. 13 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.