धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी
ढोकी : फिर्यादी नामे-सोमनाथ विष्णु फोलाणे, वय 52 वर्षे, रा. आरणी ता. जि. उस्मानाबाद यांचे शेत गट नं 450 मधील मोटार लाडास लक्ष्मी कंपनीची असा एकुण 10,000 ₹ किंमतीचा माल हा दि. 11.08.2023 रोजी 19.00 ते दि. 12.08.2023 रोजी 13.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सोमनाथ फोलाणे यांनी दि.13.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुर : फिर्यादी नामे-किशोर प्रकाश खोपडे, वय 34 वर्षे, रा. दत्त चौक गायकवाड आळी, ता.हवेली जि. पुणे यांचे लिंबाळकर दरवाज्यामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर मौजे तुळजापुर येथे फिर्यादी यांचे गळयातील 19 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच संजयकुमार नामदेवराव शिवपुरे यांचे खिश्यातील रोख रक्कम 80,000/- रु असे एकुण 1,25,000/- रु हे दि. 13.08.2023 रोजी 11.34 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या किशोर खोपडे यांनी दि.13.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापुर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.