चार हजार लाच घेताना तामलवाडीचा सहा.पोलिस उपनिरीक्षक गजाआड
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्हयात कारवाई न करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना सहा.पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांत लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. एका तक्रारदारास त्यांचे भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी यातील सहा.पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी यांनी 4000/ रुपयांची मागणी करून 4000/रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष 4000/ रूपये स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले.
थोडक्यात
युनिट - उस्मानाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 32वर्ष
▶️ आलोसे :- श्री गोकुळ बाबुराव गिरी,वय 58,सहा.पोलिस उपनिरीक्षक,पो. स्टे. तामलवाडी ता. तुळजापूर, जी उस्मनाबाद. ह.मु.आयोध्या नगर, तुळजापूर.
➡️लाचेची मागणी-- 4000/- रुपये
➡️लाच स्वीकारली-- 4000/- रुपये
▶️ कारण - यातील तक्रारदार , त्यांचे भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य क्र.252/2021 मध्ये तक्रारदार त्यांचा भाऊ व वडिल यांचेवर कारवाई न करण्यासाठी यातील अलोसे यांनी 4000/रुपयांची मागणी करून 4000/रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष 4000/ रूपये स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, - श्री अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद
▶️मार्गदर्शक- मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री रुपचंद वाघमारे--प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. औरंगाबाद
मा. प्रशांत संपते -- पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद
➡️सापळा पथक - , पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, मधुकर जाधव, शिद्धेस्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे.
*लाचे संबंधी तक्रार
टोल फ्री क्र:-1064
दूरध्वनी क्र:-02472/222879