धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना 

 

धाराशिव  : कावलदरा, ता. उस्मानाबाद येथील- सागर हिराचंद राठोड, वय 37 वर्षे यांचे अज्ञात व्यक्तीने सात व्यक्तीने दि. 18.06.2023 रोजी 03.00 ते 04.00 वा. सुमारास आत प्रवेश करुन सोन्या, चांदीचे दागिणे, रोख रक्कम 1,20,000 ₹ व दोन मोबाईल असा एकुण 4,12,000 ₹ किंमतीचा माल जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सागर राठोड यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 397 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तुगाव, ता. उस्मानाबाद येथील- बिभीषण कालीदास गडकर, वय 55 वर्षे यांचे घराचे  पाठीमागील भिंतीवरुन अज्ञात व्यक्तीने दि. 18.06.2023 रोजी 00.30 ते 04.00 वा. सुमारास आत प्रवेश करुन चांदीचे दागिणे, सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 33,000 ₹ असा एकुण 1,75,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बिभीषण गडकर यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : पारा, ता. वाशी येथील- बबन व्यंकटराव कुदळे, वय 48 वर्षे यांचे घराचा  कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 17.06.2023 रोजी 01.00 ते 06.00 वा. सुमारास आत प्रवेश करुन  पेटीतील सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 15,000 ₹ असा एकुण 50,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बबन कुदळे यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जळकोट, ता. तुळजापूर येथील- राजेंद्र काशिनाथ यादगोडा, वय 47 वर्षे यांचे जळकोट शिवारातील शेत गाट नं 518 मधील विहीरीवरील विद्युत पंप अंदाजे 16,500 ₹ किंमतीचा हा दि.17.06.2023 रोजी 23.00 ते दि. 18.06.2023 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजेंद्र यादगोडा यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : वरुडा, ता. उस्मानाबाद येथील- महेश दिलीप मगर, वय 31 वर्षे यांचे वरुडा शिवारातील वाघोली मध्यम प्रकल्प तलावावर असलेले एकुण 61,600 ₹ किंमतीचे 2 विद्युत पंप, केबल अंदाजे 16,500 ₹ किंमतीचा हा दि.17.06.2023 रोजी 23.00 ते दि. 18.06.2023 रोजी 08.00 वा. सु. हा गणेश संजय पवार, रा. वरुडा पारधी पिडी ता. उस्मानाबाद, तर बुकनवाडी, ता. कळंब येथील- बालाजी अंकुश सरवदे या दोघांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या महेश मगर यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : वाशी येथील- संभाजी ओमप्रकाश जगताप, वय 34 वर्षे यांचे हॉटेल शिवराज बार दुकानाचे पाठीमागील भिंतीवरील खिडकीचे गज अज्ञात व्यक्तीने दि. 15.06.2023 रोजी 20.00 वा. सुमारास तोडून आत प्रवेश करुन देशी विदेशी दारुच्या 784 सिलबंद बाटल्या एकुण 1,48,360 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या संभाजी जगताप यांनी दि.18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.