शिराढोण  : सासरी येण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा खून 

तुळजापुरात नवविवाहित महिलेची आत्महत्या 
 

शिराढोण  : शिराढोण  येथील श्रीमती काजल जाधव, वय 20 वर्षे या गावी सोबत येण्यास तयार होत नसल्याच्या रागातून पती- कृष्णा वायलेराम जाधव, रा. मांजरगाव, ता. बदनापुर, जि. जालना यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी 13.30 वा. सु. काजल यांना विळा, विट, पक्कड, पाईप, सळईने मारहान करुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या केवळ मारुती माने, रा. शिराढोन यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : श्रीमती प्रिया पंकज घोडके, वय 23 वर्षे, रा. तुळजापूर यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 02.00 वा. सु. राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रिया यांच्या लग्नातील बाकी राहिलेले पैसे प्रिया यांच्या माहेरकडील लोक सासरकडील लोकांना देत नसल्याच्या कारणावरुन पती- पंकज राजेंद्र घोडके, सासरा- राजेंद्र, सासु- वनमाला यांनी प्रिया यांचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून प्रिया यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयतेचा भाऊ- सुनिल नवनाथ शिलवंत, रा. तुळजापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे 

तामलवाडी  : सांगवी (काटी), ता. तुळजापूर येथील अक्षय पोपळे, विशाल पोपळे, पारुबाई पोपळे यांनी गावातील बांधकाम मिस्त्री सुधाकर आबा शेंडगे यांना दि. 21 ऑक्टोबर रोजी 14.30 वा. सु. फोन कॉल करुन आपल्या घरी बोलावून घेतले. यावेळी सुधाकर यांनी बांधकामाचे राहीलेले पैसे मागीतल्याने पोपळे कुटूंबीयांनी सुधाकर यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सुधाकर यांच्या पत्नी- सुरेखा शेंडगे यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : दाउतपुर ग्रामस्थ- महेश मदने, सुधाकर थोरात, बापु मदने, सुशिला मदने अशा चौघांनी जुन्या वाद-विवादातून दि. 20 ऑक्टोबर रोजी गावकरी- बालाजी पांढरे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने पांढरे यांच्या उजव्या हाताचे बोट मोडले. अशा मजकुराच्या पांढरे यांनी दि. 22 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.