उस्मानाबाद तालुक्यात तरुणीचा लैंगिक छळ

 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एका तरुणाने गावातीलच एका 22 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) “तुझे माझ्याकडे अश्लील छायाचित्रे आहेत, ते मी प्रसारीत करतो.” अशी बदनामीची  भिती तीला घालून सन- 2016 - 2021 दरम्यान अनेकदा त्या तरुणीवर लैंगीक अत्याचार केले. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दि. 12.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

कळंब  : भीमनगर, कळंब येथील निलेश बाबुराव पारडे हे दि. 10.01.2021 रोजी 02.00 वा. सु. सरकारी दवाखान्यात रुग्ण असलेल्या नातेवाईकाकडे डॉ. आंबेडकर चौकातील रस्त्याने जात होते. यावेळी ग्रामस्थ- अंगद बारगुले, प्रशांत बारगुले, शिवदास बारगुले, सुजीत बारगुले यांसह एका अनोळखी व्यक्तीने जुन्या वादावरुन निलेश पारडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी निलेश हे त्यांच्या तावडीतून सुटका करुन सरकारी दवाखान्यात नातेवाईकांकडे गेले असता तेथेही नमूद लोकांनी निलेश यांना मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निलेश पारडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.