उमरग्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

 उमरगा  : एका गावातील एक 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 20.02.2023 रोजी 16.30 वा. सु. जंगलात लाकडे आणण्यासाठी गेली असता. ती एकटी असल्याची संधी साधून गावातील एका तरुणाने तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तर दुसऱ्याने तिस लाकडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पिडीतेच्या आजीने दि. 22.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  376, 376(3), 324, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशीत कुत्र्याने शेळी फाडल्याच्या कारणावरुन मारहाण 

 वाशी  : बोरी, ता. वाशी येथील- हनुमंत शिंदे, आश्रुबा शिंदे, शारदा  शिंदे, जयश्री शिंदे, लक्ष्मण शिंदे,अच्युत शिंदे या सर्वांनी कुत्र्याने शेळी फाडल्याच्या कारणावरुन दि. 06.02.2023 रोजी 18.30 वा. दरम्यान बोरी शिवारात गावकरी- रेशमा बापू शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुह्राडीच्या दांड्याने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत रेशमा यांचा डावा हात मोडला आहे. अशा मजकुराच्या  रेशमा शिंदे यांनी दि.22.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

उमरगा : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 22.02.2023 रोजी 08.00 वा. सु.  उमरगा येथे आय.डी.सी. येथील राईस मिल जवळ रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान भाडगाव, ता. लातूर येथील- सचिन नरसिंग अजने, शहाजी भालके, तर साई नगर, लातूर येथील- सदिंप साहेबराव पवार दे तिघे रिक्षा मध्ये बसून स्वताचे कब्जात कत्ती व चाकू बाळगुन लोकांना त्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचे उद्देशाने फिरत असतांना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.