कळंब तालुक्यात दोन ठिकाणी रोड रॉबरी 

आयशर टेम्पो, ट्रक मधील हळद, सोयाबीन लुटले  
 

कळंब  : फिर्यादी नामे- राजेश पांडुरंग शिंदे, वय 35 वर्षे, रा. परभणी सुपर मार्केट नवा मोंढा पोलीस ठाणे समोर ता.जि. परभणी हे वसमत येथील मोंढ्यातुन आयशर टॅम्पो गाडी क्रमांक एमएच 26 बी.ई. 6464 मध्ये एकुण 169 कट्टे हळद अंदाजे 50 किलो वजनाची प्रती क्वींटल 15,000₹ प्रमाणे असा एकुण 9 टन 570 किलो अंदाजे 14,35,050₹ किंमतीची हळद घेवून जात असताना दि. 25.09.2023 रोजी 04.00 वा. सु  कन्हेरवाडी पाटी येथे व दि. 25.09.2023 रोजी 05.00 वा. सु. मस्सा खं येथे ता. कळंब जि. धाराशिव येथे  अज्ञात 6 व्यक्तीने राजेश शिंदे यांचे गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी देवून ट्रक मधील 1,12,500 ₹ किंमतीची हळद व इसम नामे- अशोक पांडुरंग खंदारे, वय 39 वर्षे, रा. मांडवा, ता. कळंब जि. धाराशिव यांचे ट्रक क्र एमएच 45 ए एफ 6271 मधील सोयाबीनचे 15 पोते प्रतृयेकी पोते 90 किलोचे  असे एकुण 67,500₹ किंमतीचे सोयाबीन व हळदीचे पोते असा एकुण 1,80,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी राजेश शिंदे यांनी दि.25.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-395, 380, 341, 506, सह 4/25 भारतीय हत्यार कायदा सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : फिर्यादी नामे- लक्ष्मी लक्ष्मण दंडगुले, वय 36 वर्षे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांचे भोसगी शिवारातील शेतातुन शेळी पालनाचे पत्री शेडसमोरील लोखंडी गेट अज्ञात व्यक्तीने दि. 23.09.2023 रोजी 23.30 ते दि. 24.09.2023 रोजी 07.00 वा. सु. बाजूस सरकावुन शेडमधील अंदाजे 70,000₹ किंमतीचे लहान मोठे 14 बोकडे व 4 शेळ्या  चोरुन नेल्या अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मी दंडगुले यांनी दि.25.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-461, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.