उस्मानाबाद जिल्ह्यात अपहारण, मारहाण , गंजीला आग घटनेची नोंद 

 

उस्मानाबाद :  अशोककुमार झाबरमल, वय 28 वर्षे, (मुळ रा. राजस्थान) सध्या रा. ठाकरेनगर उस्मानाबाद हे दि.02.02.2023 रोजी सकाळी 08.00 वा. छ.संभाजी चौकात उभे होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कारपिओ वाहनातून आलेल्या चार व्यक्तींनी अशोककुमार यांना हात धरुन आपल्या वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी नेउन त्यांचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या नातेवाईक कैलास कसाना, रा. ठाकरेनगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं. कलम 34,365 अंतर्गत गुन्हा नोदंवला आहे.

मारहाण 

परंडा  : सोमवार गल्ली, परंडा येथील- कृष्णा भगवान धनवे, हे दि01.02.2023 रोजी 23.15 वा. सु. परंडा धनवे वस्ती येथील डिपीजवळ असताना यावेळी मंगळवार पेठ, परंडा येथील- संदिप शेळके, रामराव शेळके, सोन्या शेळके, बाळू शेळके, सुधीर शेळके यांनी संगणमताने  एमएसईबी डिपीतील फ्युज काढण्याचे कारणावरुन कृष्णा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने व काठीने  मारहान करुन. या मारहानीत कृष्णा यांचे दोन्ही हाताचे बोटावर मारुन गंभीर जखमी केले. कृष्णाच्या बचावास आलेले त्यांचे भाउ रामदास यांनाही संदीप यांने डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या रामदास धनवे यांनी दि. 02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नुकसान 

उमरगा  : प्रेमनाथ पवार रा नाईचाकुर यांचा गावकरी  राजेद्रं व निखील जाधव या भावासोबत जमीन खरेदी विक्री व्यवहाराचा वाद आहे. या वादातून जाधव बधूंनी दि.31.01.2023 रोजी .03.00 वा. सु. प्रेमनाथ पवार यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या गंजीला आग लावून जाळून टाकले यात प्रेमनाथ यांचे अंदाजे 1,50,000 ₹ चे नुकसान झाले. अशा मजकुराच्या प्रेमनाथ पवार यांनी दि. 02.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.