एफडी केलेल्या पैशामध्ये हिस्सा दे म्हणून नातेवाईकांचा तगादा 

नळदुर्गमध्ये तरुणाची आत्महत्या 
 

नळदुर्ग  : एफडी केलेल्या पैशामध्ये हिस्सा दे म्हणून नातेवाईकांनी तगादा लावल्याने नळदुर्गमध्ये एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  विजय उर्फ बाळराजे हरी डुकरे (वय 40 वर्षे, रा. भवानी नगन, नळदुर्ग )  असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

आरोपी नामे- 1)ज्योती देवानंद सुरवसे 2) देवानंद मुरलीधर सुरवसे 3) रुपाली सुनिल हिरवे रा. बिड ता. जि. बीड यांनी मयतांने 21 प्लॉट विक्री करुन बॅंकेमध्ये 25,00,000 लाख रुपयाची एफडी केलेल्या पैशामध्ये हिस्सा दे म्हणून  नमुद आरोपीतांनी नमुद मयतास वांरवांर शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून दि. .06.09.2023 रोजी 07.00 पुर्वी नळदुर्ग येथे मयताचे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. 

या आत्महत्या प्रकरणी  मयताची पत्नी पोर्णीमा विजय डुकरे, वय 23 वर्षे, रा. भवानी नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ह.मु.विजापूर रोड अपना बझार जवळ सोलापूर ता. सोलापूर जि. सोलापूर यांनी दि. 07.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदववण्यात आला आहे. 

 मारहाण

परंडा  : आरोपी नामे- 1)सुखदेव विश्वनाथ टोणपे, 2)वैभव पोपट शिंदे, 3) निखील पोपट शिंदे सर्व रा. लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि.07.09.2023 रोजी 08.15 वा. सु. ग्रामपंचायत ऑफीस लोणी येथे फिर्यादी नामे- विनोद पांडूरंग शिंदे, वय 33 वर्षे, रा. लोणी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद हे नेहमी प्रमाणे गावातील हनुमान मंदीरात दर्शनासाठी जात असताना नमुद आरोपी हे म्हणाले की तु ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाला आहे, तु इकडुन यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने व चाकूने कपाळावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी विनोद शिंदे यांनी दि.07.09.2023 दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन परंडा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.