पाडोळीच्या  शिक्षकास ५० हजाराची लाच मागितली , २५ हजार घेताना पकडले 

व्यंकट विश्वनाथराव गुंड यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल , दोघांना अटक 
 

उस्मानाबाद - पन्नास हजार रुपयांची लाच मागणी करून पंचांवीस हजार लाच स्विकारल्याने मुख्याध्यापकसह सहशिक्षकास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. 

तक्रारदार हे शिक्षक  असून यांचे वरिष्ठ वेतन मिळवून देण्यासाठी आणि शाळेचे इमारत बांधकामासाठी  यातील  आरोपी लोकसेवक 1.  राजेन्द्र धोंडीबा सूर्यवंशी वय 45 वर्ष मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पडोळी (आ) यांनी  तक्रारदार यांच्याकडे 50,000 रुपये लाच रकमेची मागणी करून आरोपी लोकसेवक 2.  अमोल नागनाथ गुंड, वय 41 वर्ष, सहशिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पाडोळी (आ) यांच्या मार्फतीने स्वीकारली तसेच इलोसे 3.  व्यंकट विश्वनाथराव गुंड, संस्थापक अध्यक्ष, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, पाडोळी प्रोत्साहन दिल्याने आणि तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधून तक्रार दिली असता आज दि.16/12/2021 रोजी पडोळी येथील शाळेत  सापळा लावण्यात आला. 

याबाबत बेंबळी पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक  विशाल खांबे ला. प्र.वि.औरंगाबाद  प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे,  चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन 1. प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)2. गौरीशंकर पाबळे, ला. प्र. वि. उस्मानाबाद मो. क्र. 8888813720 यांनी केले आहे.